शेतकऱ्यांनो, सरसकट अतिवृष्टी नुकसान भरपाई बँक खात्यावर जमा; संपूर्ण यादी पहा Crop Insurance Pikvima List

Crop Insurance Pikvima List : राज्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने एक मोठे मदत पॅकेज जाहीर केले आहे. या घोषणेनुसार, पीक विमा भरलेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी हेक्टरी ₹१७,००० सरसकट पीक विमा नुकसान भरपाई देण्याची महत्त्वाची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

यासोबतच, शासनाने नुकसानीची भरपाई आणि पीक विम्याच्या प्रक्रियेतही मोठे बदल केले आहेत. ही मदत कोणाला मिळणार आणि ती मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी कोणती काळजी घ्यावी, याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे दिली आहे.

शासनाने जाहीर केलेले महत्त्वपूर्ण निर्णय

राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या नुकसानीसाठी जाहीर केलेल्या पॅकेजमधील मुख्य बाबी: Pikvima List

कोणाला मिळणार हेक्टरी ₹१७,००० ची रक्कम?

राज्यातील २९ जिल्ह्यांमधील २५३ तालुक्यांमधील २०५९ महसूल मंडळांमध्ये १००% नुकसान झाल्याचे दाखवण्यात आले आहे.

पात्रता: या महसूल मंडळांमध्ये ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे, त्यांना राज्य शासनाची नुकसान भरपाई सरसकट मिळणार आहे.

विमा मंजुरी: या शेतकऱ्यांच्या नुकसानीसाठी त्यांना पीक विमा योजनेअंतर्गत पीक विमा देखील मंजूर होणार आहे.

महत्वाचा मुद्दा: घोषित केलेली ₹१७,००० ची रक्कम ही ‘ईल्ड बेस’ (उत्पादन आधारित) सूत्राने मंजूर होणाऱ्या रकमेवर आधारित आहे. अनेक वर्षांच्या सरासरीमुळे, ही रक्कम २५ हजार रुपयांच्या वर जाणे शक्य नसल्याने, ₹१७,००० ही अंतिम मदत असू शकते.

Leave a Comment