Namo Shetkari Yojana महाराष्ट्रातील तसेच देशभरातील शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे! केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM Kisan Samman Nidhi) योजनेचा २१ वा हप्ता आणि महाराष्ट्र सरकारच्या नमो शेतकरी महासनमान योजनेचा (Namo Shetkari Maha Sanman Yojana) ८ वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे.
या दोन्ही योजनांमुळे लाखो शेतकऱ्यांना एकत्रित आर्थिक मदत मिळणार असून, सरकारकडून हप्त्यांच्या तारखांची अधिकृत घोषणा लवकरच होणार आहे. चला तर मग जाणून घेऊया यासंबंधी सविस्तर माहिती
पीएम किसान सन्मान निधी योजना — २१ वा हप्ता
📅 संभाव्य तारीख
केंद्र सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार २१ वा हप्ता नोव्हेंबर 2025 च्या दुसऱ्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.
💰 हप्त्याची रक्कम
प्रत्येक पात्र शेतकऱ्याला ₹2000 इतकी रक्कम थेट बँक खात्यात मिळते.
वर्षभरात शेतकऱ्यांना ₹6000 इतकी एकूण मदत तीन हप्त्यांमध्ये मिळते.Namo Shetkari Yojana
✅ पात्रता
- लाभार्थी शेतकरी भारतातील नागरिक असावा.
- शेतकऱ्याचे नाव PM Kisan Portal वर नोंदलेले असावे.
- E-KYC पूर्ण केलेले असणे अत्यावश्यक आहे.