e-KYC करूनही या महिलांचे हप्ते होऊ शकतात बंद आणि होईल वसुली. Ekyc ladki bahin update

Ekyc ladki bahin update  लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी प्रक्रिया सध्या सुरू असून, सरकारने यासाठी १८ नोव्हेंबरपर्यंत मुदत दिली आहे. तथापि, अनेक महिलांनी ई-केवायसी पूर्ण केल्यानंतरही त्यांचे हप्ते कायमस्वरूपी बंद होण्याची किंवा त्यांना मिळालेली रक्कम वसूल होण्याची शक्यता आहे. याचे मुख्य कारण म्हणजे केवायसी करताना तुम्ही दिलेल्या आधार क्रमांकावरून सरकारला तुमच्या कुटुंबाची संपूर्ण आर्थिक आणि सामाजिक माहिती सहज उपलब्ध होत आहे.

या योजनेसाठी सर्वात महत्त्वाची अट म्हणजे लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे. जर तुमच्या पतीचे किंवा वडिलांचे उत्पन्न या मर्यादेपेक्षा जास्त असेल तर तुमचा हप्ता बंद होणार आहे. यासोबतच, ज्या कुटुंबातील सदस्य आयकर (Income Tax Return – ITR) भरतात, त्या महिलांनाही योजनेचा लाभ मिळणार नाही. योजनेचा लाभ मिळवण्यासाठी काही मूलभूत निकष पूर्ण करणे आवश्यक आहे. सर्वप्रथम, अर्जदार महिला महाराष्ट्राची रहिवासी असणे बंधनकारक आहे. जर इतर राज्याच्या व्यक्तींनी फॉर्म भरून लाभ घेतला असेल, तर त्यांचे पैसे वसूल केले जातील आणि त्यांचे खाते गोठवले जाऊ शकते. Ekyc ladki bahin update

कुटुंबातील सदस्य संख्येचा विचार केल्यास, एका शिधापत्रिकेवर (रेशन कार्ड) केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेऊ शकते. या मर्यादेपलीकडे लाभ घेतल्यास हप्ता बंद होईल. तसेच, लाभार्थ्याकडे स्वतःचे आधार लिंक असलेले बँक खाते असणे आवश्यक आहे आणि तिचे वय किमान २१ वर्षे पूर्ण असावे.

Leave a Comment