Gold Silver Price: लग्नसराई सुरू होताच सोने, चांदीचा पुन्हा मोठे बदल! आजचे लाईव्ह बाजार भाव पहा

Gold Silver Price: तुलसी विवाहानंतर सर्वदूर लग्नसराईची सुरूवात झाली असून, त्यामुळे सोने आणि चांदीच्या मागणीत वाढ झाली आहे. या वाढलेल्या मागणीमुळे जळगावसह सुवर्ण बाजारपेठेत दोन्ही धातूंच्या दरात पुन्हा तेजी दिसून आली आहे.

दिवाळीनंतर काही प्रमाणात दरवाढीला लगाम लागला असला तरी, लग्नसराईमुळे दरांनी पुन्हा उसळी घेतली आहे.

सोमवार, ३ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी बाजार उघडताच ₹३०९ ची वाढ नोंदवली गेल्याने सोन्याचे दर ₹१,२४,८३६ रुपयांपर्यंत पोहोचले.

चांदीच्या दरात मोठी वाढ

सोमवार, ३ नोव्हेंबर २०२५ रोजी चांदीमध्ये ₹३,०९० ची मोठी वाढ नोंदवली गेल्याने चांदीचे दर ₹१,५७,५९० रुपयांपर्यंत जाऊन पोहोचले.

जागतिक बाजारातील स्थिती

सोमवारी जागतिक स्तरावर सोन्या-चांदीचे भाव वाढताना दिसले:Gold Silver Price

जागतिक सोने: कॉमेक्सवरील सोन्याचे भाव ०.६६ टक्क्यांनी वाढून ४०२२.७० डॉलर प्रति औंसवर व्यवहार करताना दिसले.

जागतिक चांदी: कॉमेक्सवरील जागतिक चांदीच्या किमती सुरुवातीच्या व्यवहारात ०.९० टक्के म्हणजेच ०.४४ डॉलरने वाढून ४८.६० डॉलर प्रति औंसवर पोहोचल्या.

तज्ज्ञांचा अंदाज आहे की, लग्नसराईच्या हंगामामुळे आणि मागणीत वाढ झाल्यामुळे येत्या आठवड्यात सोन्याची मागणी आणखी वाढेल, ज्यामुळे किंमतीत आणखी वाढ होऊ शकते. Gold Silver Price

Leave a Comment