लाडकी बहीण योजना eKYC करण्याची सर्वात सोपी पद्धत, जाणून घ्या संपूर्ण माहिती. Ladki Bahin Yojana E-KYC

Ladki Bahin Yojana E-KYC महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली “लाडकी बहीण योजना” ही राज्यातील महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची योजना आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा ₹1500 इतकी आर्थिक मदत दिली जाते. मात्र ही मदत मिळवण्यासाठी eKYC (इलेक्ट्रॉनिक ओळख पडताळणी) पूर्ण करणे आवश्यक आहे. अनेक महिलांना eKYC कशी करायची याची अचूक माहिती नसल्यामुळे त्यांचे अर्ज अपूर्ण राहतात. त्यामुळे आज आपण या लेखात लाडकी बहीण योजना eKYC कशी करावी?, त्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात, ऑनलाईन प्रक्रिया

लाडकी बहीण योजना eKYC का करावी लागते?

  • लाडकी बहीण योजनेअंतर्गत दरमहा ₹1500 थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होतो. त्यामुळे सरकारला खात्री करायची असते की –
  • लाभार्थी खरी आहे की नाही
  • तिचे बँक खाते व आधार एकमेकांशी जोडलेले आहे की नाही
  • ती महाराष्ट्राची रहिवासी आहे की नाही
  • या सर्व गोष्टींची पडताळणी करण्यासाठी eKYC आवश्यक आहे.Ladki Bahin Yojana E-KYC

लाडकी बहीण योजना eKYC करण्याचे प्रकार

  • eKYC करण्याचे दोन पर्याय आहेत –
  • ऑनलाईन पद्धत (स्वतः मोबाईल किंवा संगणकावरून)
  • ऑफलाईन पद्धत (सेवा केंद्र, महा e-Seva केंद्र, किंवा CSC केंद्रातून)

eKYC करताना लक्षात ठेवावयाच्या महत्वाच्या सूचना

  1. आपला मोबाईल क्रमांक आधार कार्डाशी लिंक असणे आवश्यक आहे.
  2. चुकीचा मोबाईल क्रमांक भरल्यास OTP येणार नाही.
  3. बँक खाते लाभार्थीच्या नावावरच असावे.
  4. एकाच व्यक्तीने दोनदा अर्ज केल्यास अर्ज रद्द केला जाईल.
  5. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर “eKYC Success” संदेश मिळाला पाहिजे, तोपर्यंत साइट बंद करू नका.
  6. सेवा केंद्रात eKYC करताना बायोमेट्रिक पडताळणी योग्यरित्या पूर्ण झाली का, हे तपासा. Ladki Bahin Yojana E-KYC

Leave a Comment